येल्लोरीवाडी येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजन सोहळा संपन्न

 येल्लोरीवाडी येथील हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या भूमिपूजन सोहळा संपन्न औसा प्रतिनिधी 


औसा तालुक्यातील येल्लोरीवाडी (कोळेवाडी) येथील जागृत हनुमान मंदिराचा भूमिपूजन व जिर्णोद्धारांचा कार्यक्रम पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. 

येल्लोरीवाडी येथील ब्रह्मचारी शामराव पाटील यांच्या श्रद्धेने पावन झालेल्या या भूमीत हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

या प्रसंगी प्रसिद्ध पुरोहित पुरुषोत्तम जोशी यांनी विधीवत मंत्रोच्चार करून हा भूमिपूजन सोहळा सुरू केला.सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे येथील वारकरी बांधवांनी टाळ मृदंगाच्या निनादात भव्य मिरवणूक काढून प्रारंभी स्वागत केले. येल्लोरी वाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या सढळ हाताने जमा केलेल्या लोकवर्गणीतून हा मंदिराचा जीर्णोद्धार साकारणार असून प्रसिद्ध शिल्पकार अंतेश्वर केंद्रे हे शिखर सुशोभिकरणाचे काम व शिल्प साकारणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येल्लोरी सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, सरपंच दशरथ सर्जे नाथ संस्थांचे सद्भक्त शाम कुलकर्णी मुक्तेश्वर पडसाळगे ,पत्रकार राम कांबळे, विलास तपासे ,विठ्ठल पांचाळ कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या आशिर्वचनातून बोलताना सद्गुरू गहिनीनाथ महाराज म्हणाले कि संकट मोचन हनुमान म्हणजे सर्व भाविक भक्तांचे शक्तिस्थान असून हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार आपल्या सर्वांच्या सहकार्याने व पुढाकाराने होत असून ही वास्तू दर्जेदार व्हावी यासाठी आपण स्वतः बांधकाम सुरू असताना लक्ष घालणार आहोत. असेही सद्गुरू घेण्यात महाराज यांनी यावेळी म्हटले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्य अभियंता हिराकांत सर्जे ,महादेव सर्जे,गुरुनाथ सर्जे ,सुधीर सर्जे, नारायण सर्जे विजय कुमार सर्जे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments