महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा विटंबनेचा राष्ट्रवादीकडून निषेध व आरोपीस अटक करण्याची मागणी.
औसा प्रतिनिधी
औसा.दि.16. औरंगाबाद येथे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना दि.8 मार्च रोजी झाली. यामुळे सर्व महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात या घटनेमुळे जनप्रक्षोभ उफाळण्याची शक्यता आहे. समता शांतता व बंधुता याचा संदेश देणारे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना ही अतिशय निंदनीय घटना आहे. ही घटना ज्यांनी घडवून आणली आशा सर्व समाजकंटकांना ताबडतोब अटक करावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माननीय तहसीलदार औसा यांना देण्यात आले. निवेदनावर औसा नगरीचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख,माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख गोविंद जाधव, विनायक सूर्यवंशी, एडवोकेट शिवाजी सावंत, अविनाश टिके, अफसर अ. शेख, युनुस चौधरी, वकील इनामदार, संगमेश्वर उटगे, संतोष औटी, मुकेश तोवर, उमर पंजेशा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनानंतर तहसील कार्यालयात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नावाचा जयघोष करून ज्यांनी ही घटना घडवली त्यांना अटक करण्यात यावे अशी घोषणा देण्यात आल्या.
0 Comments