चलबुर्गा येथील पाणी टंचाई दूर करून मुबलक पाण्याची व्यवस्था करा
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील चलबुर्गा ग्रामपंचायती अंतर्गत आदर्श वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे गावातील नागरिकांचे तीव्र उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याविना हाल-अपेष्टा होत आहेत .तरी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकाने याकामी लक्ष घालून चलबुर्गा येथील पाणी टंचाई दूर करून ग्रामस्थांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करावा अशी मागणी सुर्यकांत भुजबळ गट विकास अधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे या निवेदनावर सर्व श्री हनुमंत कल्लुरे ,श्रीमंत सुरवसे, गोपाळ परिहार, प्रमोद परिहार, निलेश मोरे ,शिवाजी मोरे ,भास्कर परिहार, राहुल जाधव, दत्तात्रेय गोरोबा गडदे , दिगंबर नटराज, रतन पंडीत पवार, राजेंद्र पुरी, लव शिंदे ,हनुमंत मोरे ,दिलीप कांबळे, आशा वाघमारे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
0 Comments