राज्यस्तरीय भजन गायन स्पर्धेची रविवारी सांगता

 राज्यस्तरीय  भजन गायन 

स्पर्धेची  रविवारी सांगता


-------------------------------

110 स्पर्धकांची नोंदणी

 16  जण पुरस्काराचे मानकरी

----------------------------------------

     औसा  प्रतिनिधी

 दि. 14  मार्च  2022


         औसा येथील माऊली प्रतिष्ठानच्या वतीने मुक्तेश्वर मंदिरात दोन दिवसीय राज्यस्तरीय  भजन गायन स्पर्धेचे आयोजन 12 व 13 मार्च रोजी करण्यात आले होते.


      स्पर्धेचे उद्घाटन पं. शिवरुद्र स्वामी, पं. विठ्ठलराव जगताप, व्यंकटराव पन्हाळे, अड. मुक्तेश्वर वागदरे यांच्या हस्ते करण्यात आले.


       या स्पर्धेत पुणे, लातूर, सोलापूर, औसा, उदगीर, निलंगा येथील 110 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. खुला गट आणि बाल गटातील एकूण 16 विजेत्यांना मानपत्र आणि रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.


       प्रथम - उन्नती मुंडे, स्वरा किंबहुने, अवधूत सुरवसे, मोनिका किंबहुने.

द्वितीय-- अविक्षा शिंदे, अपूर्वा पाटील, संजय मोरे, आर्या टिळक.

तृतीय--- समीक्षा हुरदळे, रामेश्वरी दिवाण, स्नेहा शेवाळे, अस्विनी मेटे,

उत्तेजनार्थ --- संजीवनी भदाडे,  प्रविता मुनी, विश्वनाथ धुमाळ, मनोज बारसकर  हे सोळाजण पुरस्काराचे मानकरी ठरले.


     यावेळी अड. भालचंद्र पाटील,  गजेंद्र जाधव, नरसिंग राजे, संतोष थोरात, रमेश भुजबळ, विजूअप्पा मिटकरी, धनंजय कोपरे, रवी राचटे, सोनू डगवाले, चैतन्य पांचाळ, शिवाजी भातमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.


    प्रास्ताविक व्यंकटराव राऊतराव यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. युवराज हालकुडे यांनी तर हणमंत लोकरे यांनी आभार मानले.


मो. 9011339173.

Post a Comment

0 Comments