प्रभुराज प्रतिष्ठाण लातुरचा अनोखा उपक्रम

 प्रभुराज प्रतिष्ठाण लातुरचा अनोखा उपक्रम


लातूर.-२५.३.२०२२ रोजी  प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने  हरंगुळ येथील ग्रामीण भागात जिल्हा प्रशाला शिकणारे व मोलमजुरी करून उपजीविका भागविणारे परिवारातील कांही ग्रामीण भागातील शिक्षण घेणाऱ्या  मुलींना कित्येक किलोमिटरहुन शाळेत शिकण्यासाठी चालत ये जा करावे  लागत आहे.या सर्व  बाबी व येणारी अडचणी लक्षात घेऊन सामाजिक उपक्रमातून कांही मित्र कंपनीने जुनी सायकल दान कारा या संकल्पनेतून उमाकांत क्षीरसागर यांनी दोन  सायकल जमा करत  त्यास  पूर्णपणे नवीन स्वरूपात आणून  ती वापरण्या योग्य तयार करून गरजू व मेहनती परिवारातील  मुलींना सायकल वाटप करण्यात आले.असे उपक्रम व सामाजिक कार्य जनतेने पुढे होऊन नवीन नवीन योजना आखून गराजुवंताना कसे पुरविता येईल आणि अडचण  दूर करता येईल या वर बारकाईने  लक्ष देऊन त्या समाश्या सोडविल्या जातील  असे  सामाजिक कार्य करावे.

यावेळी प्रभुराज प्रतिष्ठाण चे अँड.अजय कलशेट्टी,समाजसेवक  उमाकांत क्षीरसागर,उपसरपंच धनराज पाटील, माऊली दहिफळे,विशाल झुंजे पाटील,वैभव जाधव,प्रशाला चे मुख्याध्यापक व शिक्षक आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments