आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून ९० किमी लांबीच्या शेतरस्त्यांच्या कामांना मंजुरी.

 आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून ९० किमी लांबीच्या शेतरस्त्यांच्या कामांना मंजुरी. 











औसा - शेतरस्ते कामातून शेतकऱ्यांच्या अर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले शेत रस्त्याचे जनक आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे औसा विधानसभा मतदारसंघातील ९० किलोमीटर लांबीच्या २२ कोटी रुपयांच्या शेतरस्ते कामांच्या खडीकरण व मजबुतीकरणाला मातोश्री ग्रामसमुध्दी पाणंद शेतरस्ते योजनेतून मंजूरी मिळाली आहे. 



                  आपला संपुर्ण आमदार फंड शेतकऱ्यांना समर्पित करीत औसा विधानसभा मतदारसंघात शेतरस्ते हे अभियान हाती घेवून या अभियानातून संपूर्ण मतदारसंघात शेत रस्ते कामाचे जाळे निर्माण करून देत या अभियानाला आमदार अभिमन्यू पवार यांनी एका व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले असून हे अभियान आता राज्याला दिशादर्शक ठरत आहे गतवर्षी औसा विधानसभा मतदारसंघात सातशे किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामे यशस्वीपणे पार पडली आहेत. तर या वर्षी एक हजार किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या कामासाठी प्रशासन व शेतकऱ्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे हे अभियान यशस्वी होताना दिसत आहे. गत पंधरा दिवसात आमदार अभिमन्यू पवार यांनी राज्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची मुंबईत दोन वेळा भेट घेवून केलेल्या पाठपुराव्यामुळे औसा मतदारसंघात ९० किलोमीटर लांबीच्या शेतरस्त्यांच्या खडीकरण व मजबुतीकरण कामांना मातोश्री ग्रामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. यामध्ये औसा तालुक्यातील ५४.५० तर कासारसिरसी मंडळातील ३५.५० किमी लांबीच्या शेतरस्ते कामांचा समावेश आहे. 



          आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रस्तावित केलेल्या कामांपैकी काही कामे मंजूर झाली असून उर्वरित कामांसाठी तसेच मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांच्या कामांना पूर्वीप्रमाणे स्थानिक पातळीवर मंजुरी देण्यात यावी यासाठी ते सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत. या कामांना मंजुरी दिल्याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रोहयो मंत्री संदीपान भूमरे व याकामी मार्गदर्शन करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.




.... 

Post a Comment

0 Comments