विविध समस्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडत कनखर नेतृत्व म्हणून ओळख:प्रदीप मोरे

 विविध समस्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडत कनखर नेतृत्व म्हणून ओळख:प्रदीप मोरे


औसा प्रतिनिधी

एम आय एम पक्षाच्या  वर्धापनदिना निमित्ताने मित्र परिवाराच्या वतीने एम आय एम प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांचा सत्कार औसा शहरातील जलाल शाही चौक येथे मराठा समाजाचे अध्यक्ष व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने  सत्कार करण्यात आला.या सत्कार प्रसंगी एम आय एम पक्षाच्या कामाची पावती म्हणून सतत गेली 16 वर्षापासून पक्षात एकनिष्ठ राहून तालुक्यासह, शहरातील जनतेच्या विविध समस्या प्रश्नांना शासन दरबारी वाचा फोडत कनखर नेतृत्व म्हणून एम आय एमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी चांगली ओळख निर्माण केल्याचे प्रतिपादन मराठा समाजाचे अध्यक्ष  प्रदीप मोरे यांनी केले.यावेळी मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.या सत्कार प्रसंगी सुमैय्या फर्निचर संस्थापक शेख फकीरपाशा, नय्युम पटवेकर, बाबा कुरेशी, जुबेर सय्यद आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments