राज्यातील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले सेतूसूविधा केंद्र चालू करा:धिरज भैय्या देशमुख
औसा प्रतिनिधी
जिल्हा सह राज्यातील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले *सेतूसुविधा केंद्र* हे टेंडरची मुदत संपल्याने बंद झाले आहेत ते त्वरीत चालु करन्याची मागणी *मा आ धिरजभैय्या देशमुख* यांनी आज विधानसभेत केली. या केंद्राच्या माध्यमातून एका छताखाली मिळणाऱ्या सर्व सुविधा आता मिळत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी इतर ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत. अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे *सेतू सुविधा केंद्र'* तातडीने सुरू व्हावीत, अशी मागणी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केली.
या मागणीसंदर्भात उत्तर देताना सामान्य प्रशासन विभागाचे *राज्यमंत्री मा. दत्तात्रेय भरणे* जी यांनी *'सेतू सुविधा केंद्र'* पूर्ववत करण्याबाबत लवकरात लवकर टेंडर प्रक्रिया सुरू केली जाईल, असे आश्वासन दिले. सरकारचा हा निर्णय लातुर जिल्हा सह राज्यातील जनतेला दिलासा देणारा आहे.
0 Comments