निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनास उस्फूर्त प्रतिसाद

 निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनास उस्फूर्त प्रतिसाद 


औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील शिवली मोड येथे वेदांत पांडुरंग शिवली कर यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय प्रबोधनकार विनोदाचार्य निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा भव्य कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता निवृत्ती महाराज इंदुरीकर हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले विनोदाचार्य असून आपल्या प्रबोधन व विनोदाच्या माध्यमातून समाज जागृतीचे भरीव कार्य करीत असल्याने औसा तालुक्यातील कीर्तन महोत्सवात त्यांनी रसिक श्रोत्यांना खळखळून हसविले आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यला घालविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत असून प्रचलित काळामध्ये फॅशन व इतर बाबी च्या नावाखाली बिघडत चाललेली तरुण पिढी व तरुण मुली यांच्या वर ताशेरे ओढून इंदुरीकर महाराज यांनी समाजातले हे वास्तव चित्रण दाखवून दिले निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर हे प्रबोधनकार व कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करतात औसा तालुक्यातील शिवली मोड येथे आयोजित कीर्तन कार्यक्रमास तालुक्यातील हजारो नागरिक तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ऍड पांडुरंग शिवली कर यांनी या कीर्तन कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करून महिला व पुरुषांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली होती कीर्तन कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

Post a Comment

0 Comments