शिबिरात मोफत नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना अमित भैया देशमुख यांच्या हस्ते चष्मे वाटप
औसा प्रतिनिधी
लातूर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलच्या पूढाकारातून *मा ना अमितभैय्या देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त विलासराव_देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित शिबीरात मोफत नेत्र शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना आज *मा ना अमितभैय्या देशमुख स्वता: रूग्णालयात जाऊन चष्म्यांचे वाटप केले.वाढदिवसानिमीत्त समाजउपयोगी स्तुत्य कार्यक्रम घेतल्या बद्दल संयोजक मंडळीचे कौतूक करून *मा ना अमितभैय्या देशमुख यांनी आभार मानले.
मोतीबिंदूमुळे अंधत्व येणाऱ्या दृष्टीहीन रूग्णांची संख्या लक्षात घेता लातूरसह राज्यातील सर्व जिल्हयात अशा शिबीराचे आयोजन करावे त्यासाठी वैदयकीय शिक्षण आणि सार्वजनीक आरोग्य विभागाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल.
लातूर शहर वैद्यकीय सेवेचे केंद्र म्हणून पूढे येत आहे त्यामूळे या ठिकाणी आंतररार्ष्टीय दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
किडनीच्या आजाराच्या रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे येथील विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयात लवकरच डायलीसीसचा वॉर्ड उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही देऊन या शिबीरासाठी सुप्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ.तात्याराव लहाने व त्यांच्या टीमने वेळ दिल्या बददल त्यांचे या प्रसंगी विशेष आभार मानले.
0 Comments