बुधोडा शिवारात शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून शेतकऱ्याचे नुकसान

बुधोडा शिवारात शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून शेतकऱ्याचे नुकसान 


लातुर-प्रतिनिधी/श्रीकांत चलवाड

औसा / तालुक्यातील बुधोडा येथील मधुकर विठ्ठलराव पाटील या शेतकऱ्याच्या शेतातील दीड एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे उन्हाळ्याचे दिवस असून साखर कारखाना ऊस लवकर तोडून येत नसल्याने या शेतकऱ्याचा अचानक शॉर्टसर्किटने आग लागून ऊस जळाला तालुक्‍यात उसाचे क्षेत्र जास्त झाल्यामुळे साखर कारखान्याची तोड लवकर येत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत अशाच परिस्थितीमध्ये मधुकर विठ्ठलराव पाटील हा शेतकरी आपला ऊस साखर कारखान्याला जाईल या प्रतीक्षेत असताना अचानक शनिवार दिनांक 19 मार्च रोजी शॉर्टसर्किटने आग लागून दीड एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मधुकर विठ्ठलराव पाटील  यांच्यावर संकट कोसळले आहे या घटनेचा बुधोडा तलाठी यांनी पंचनामा केला असल्याची माहिती त्यांनी दिली

Post a Comment

0 Comments