सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते विश्वेश्वर फेस्टिव्हलचे उद्घाटन

 सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते विश्वेश्वर फेस्टिव्हलचे उद्घाटन


 औसा प्रतिनिधी

 विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित विश्वेश्वरय्या पॉलीटेक्निक संकुल येथे यावर्षीच्या विश्वेश्वर फेस्टिवल चे उद्घाटन स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या शुभास्ते दिनांक 29 मार्च 2000 22 रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षापासून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीच्या हस्ते विश्वेश्वर फेस्टिवल या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या वर्षी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड औसा तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वर फेस्टिवल च्या समारंभास उपस्थित राहणार आहेत तरी निमंत्रित व शिक्षण प्रेमी नागरिकांसह पालक व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे हे सचिव बसवराज धाराशिवे हे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments