शहर वाहतूक बस मधून महीलाना मोफत सेवा देणारी लातूर महापालिका देशात पहिली

 *शहर  वाहतूक बस मधून महीलाना मोफत सेवा देणारी लातूर महापालिका देशात पहिली


*



*दिलेल्या आश्वासनाची पूर्तता* 


*आगामी काळात शहरात गोरगरिबांसाठी लातूर कॅन्टीन सुरू करणार*


*शहरातील सर्व चौक सुशोभित होणार*


 *गॅस पाइलाइन द्वारें देणारा लातूर मराठवाड्यात पहिला जिल्हा*


लातूर दि. १८

हरिराम कुलकर्णी याजकडून


 महिला, शाळेतील मुलींना शहरात महापालिकेच्या सिटी बसमधून मोफत प्रवास देणारी लातूर महापालिका देशात पहिली ठरलेली असून मागच्या पंचवार्षिक निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे हे करीत असताना शहरातील सर्व चौक सुशोभित करण्यात येनार असून  शहरातील बाहेरगावाहून येणाऱ्या गरजू लोकांना दोन टाइम भोजन मिळावे यासाठी लवकरच मध्यवर्ती ठिकानी लातूर कॅन्टीन सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना अमित देशमुख यांनी येथे बोलताना सांगितले दरम्यान आगामी काळात शहरातील विविध विकासाच्या बाबतीत निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यानी शुक्रवारी सायंकाळी  लातूर महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात मोफत महिलाना सिटी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर विक्रांत गोजमगुंडे हे होतें तर प्रमुख अतिथी म्हणून विरोधी पक्ष नेते अँड दीपक सूळ,महापालिका आयुक्त अमन मित्त्तल ,जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड किरण जाधव,जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ,नगरसेवक रविशंकर जाधव, माजी महापौर डॉ स्मिता खानापुरे, स्थायी समिती चे माजी सभापती अशोक गोविंद पूरकर, नगरसेविका सौ सपना कीसवे,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हकीम शेख, सभापती राजकुमार जाधव आदि मान्यवर उपस्थित होते


*आगामी काळात शहरात वेगवेगळ्या योजनेतून विकासाला चालना मिळणार*


शहरात गेल्या दोन वर्षात कोरोना महामारी मुळे विकास काम थांबले होते देशातील सर्वच ठिकाणी विकासाची कामे थंड होती  जनजीवन विस्कळित झालेले होते आता हळूहळू सगळ व्यवस्थित सुरू झाले आहे राज्य सरकारकडून विविध विकासकामांसाठी निधी प्राप्त झाला असून परिसरातील सर्व रस्ते रुंदीकरण दुरुस्तीचे कामही सुरू झाली असून आगामी काळात शहरात वेगवेगळ्या भागातील सर्व चौक सुशोभित करण्यात येनार आहेत तसेच शहरात गोरगरीब जनतेसाठी लातूर कॅन्टीन सुरू करणार असल्याची सांगून यात लोकांना दोन वेळा मोफत भोजन मिळावे यासाठी लवकरच मध्यवर्ती ठिकाणी सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे यात बाहेरून आलेल्या लोकांना याचा लाभ घेता येईल असेही ते म्हणाले


*सिटी बस इथेनॉल सी एन जी इलेक्ट्रिक द्वारें चालवण्यासाठी प्रयत्न करा*


शहरात प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढले असून जिल्ह्यात मांजरा साखर परिवारातील मांजरा, रेणा साखर कारखान्यानी स्वतः चे वाहने घेवून सी एन जी द्वारें वाहतूक करीत आहेत ट्रॅक्टर सुधा कारखाने सी एन जी चा वापर करीत आहे तसा ए खादा प्रकल्प महापालिकेने हाती घ्यावा जेणेकरून प्रदूषण रोखण्यासाठी मदत होईल असे ते म्हणाले


*आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस निवडून येणारे लोकांत राहणारे लोकांना उमेदवारी देणार*


आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष निवडून येणाऱ्या कार्यकर्ते विशेषतः लोकांचा जनसंपर्क असणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट देणारं असल्याचे सांगून महिलांना ५० टक्के तिकीट देणार असून महापालिकेत ८१ नगरसेवक निवडून देणार आहेत त्यात आपले सर्वाधिक जागा मिळवणारा काँग्रेस पक्ष राहील  यात तिळमात्र शंका नाही असे सांगून निवडणुकीत ऊभे राहणाऱ्या इच्छुकांनी लोकांमध्ये जावे प्रचार कार्य सुरू करा डिजिटल नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे त्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments