श्री मुक्तेश्वर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने फुल माळी परिवारांचे सांत्वन
औसा प्रतिनिधी
श्री मुक्तेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक किशनराव फुलमाळी यांच्या धर्मपत्नी सौ रुक्मीनबाई किशनराव फुल माळी यांचे सोमवार दिनांक 28 मार्च रोजी वृद्धापकाळ आजारामुळे दुःखद निधन झाले. त्यामुळे औसा येथील श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, रविशंकर राचट्टे ,प्रभूप्पा माशाळे, डॉक्टर बसवराज पटणे, युवराज हलकुडे यांनी त्यांच्या मूळ गावी मिरखल तालुका बसवकल्याण येथे जाऊन सांत्वन करून फुलमाळी परिवारास धीर दिला. यावेळी किशनराव फुलमाळी यांचे सुपुत्र संजीव कुमार राजीव आणि सत्यवान फुल माळी तसेच देवेंद्र नावंदर आदी उपस्थित होते.
0 Comments