पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे व सपोनि विलास नवले यांचा भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने भव्य सत्कार

 


पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे व सपोनि विलास नवले यांचा भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने भव्य सत्कार

औसा प्रतिनिधी

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम,ब्रिक्स ह्युमन राईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने औसा येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.त्या अनुषंगाने या सत्कार समारंभाचे सुरुवात भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर व लातुर चे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे,या मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.यानंतर  लातुर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कार मिळाल्याबद्दल  भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने व लातरचे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व श्रीकृष्णाची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.तसेच भादा येथील सहायक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी भादा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येणाऱ्या 43 गावामध्ये त्यांनी अवैध दारूसह व इतर अवैध धंदे बंद करून त्यांच्यावर कडक कारवाई केल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट कार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल यांना लातुरचे जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह, गणपतीची मूर्ती भेट देऊन यांचाही सत्कार व तसेच औसा पोलिस ठाण्याचे पोलिस महिलांचाही उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांनाही शाल व पुष्पगुच्छ व लक्ष्मी ची फोटो देऊन सत्कार दिनांक 2 मार्च बुधवार रोजी

प्रशासकीय इमारत औसा येथे या मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.यासत्कार प्रसंगी लातूर जिल्ह्यातील औसा तालुका सुसंस्कृत तालुका असूनया दिशेने येणारे लोक संस्कृत होतात येथील जनतेची कोविड काळातील शासकीय कामाचे तंतोतंत पालन करत प्रत्येक उत्सव साजरा केला. राष्ट्रीय एकात्मताव भाईचा-यांची जपवणूक करत जो आदर्श सर्वा समोर ठेवत मराठवाड्यात वेगळी ओळख निर्माण केल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले.यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी औसा मधुकर पवार,औसा पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, सहायक पोलीस उपअधीक्षक घोरपडे मॅडम , सुवर्णाबाई नाईक राणीताई स्वामी, नेताजी जाधव, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रवक्ते सोनाली गुलबिले मॅडम आदि भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सदस्य व नागरिक, महिला आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments