कर वसुलीसाठी औसा नगरपालिकेची धडक मोहीम सुरू

 कर वसुलीसाठी औसा नगरपालिकेची धडक मोहीम सुरू


औसा प्रतिनिधी


 औसा नगर परिषदेच्या वतीने दिनांक 16 मार्च पासून नगरपालिकेच्या विविध कर वसुलीसाठी दोन पथक नेमून धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. औसा शहरांमध्ये मालमत्ता कर 60 टक्के पाणीपट्टी 42 टक्के शासकीय कार्यालयाचे वसुली 15 टक्के आणि नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या शॉपिंग सेंटर ची 70 टक्के वसुली झाली आहे. परंतु नगरपरिषदेला विद्युत बिल तसेच इतर खर्च भागविणे सध्याच्या परिस्थितीमध्ये अवघड झाले असून नगरपरिषदेच्या करवसुलीसाठी 16  मार्चपासून धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील दोन महिन्यापासून औसा शहरात स्पीकर वरून नागरिकांना नगरपालिकेच्या कराचा भरणा करण्याचे आवाहन केले असले तरी या आवाहनास प्रतिसाद म्हणावा तसा मिळाला नसल्याने नगर परिषदेने धडक वसुली मोहीम हाती घेतली आहे. शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन तसेच इतर बाबीची चौकशी करून अशा नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचाही निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. वेळेचं कराचा भरणा नाही केल्यास शासन निर्णयाप्रमाणे मालमत्ताधारकांना दोन टक्के दंड भरावा लागणार आहे तरी शहरातील नागरिकांनी नगरपालिकेस वेळेवर कराचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments