आम्ही चालवू पुढे हा विवेकी वारसा : डॉ बाबा आढाव

 *आम्ही चालवू पुढे हा विवेकी वारसा : डॉ बाबा आढावडॉ. बाबा आढाव हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तर आहेच, पण बाबा हे असंख्य संस्था - संघटना आणि चळवळीचे आधारस्तंभ, मार्गदर्शक साथी आहेत. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. बाबा आढाव हे सुरवातीपासूनचे साथी आणि मैदानावरील लढाईतील लढवय्ये राहिले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नुकतीच एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पुणे येथे झाली. या बैठकीचे उदघाटन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बाबांनी जोशपूर्ण मनोगत व्यक्त करत सदिच्छा दिल्या.


      यावेळी विचारमंचावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भोईभार, राज्य प्रधानसचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, संजय बनसोडे, गजेंद्र सुरकार, नंदकिशोर तळाशीलकर, राज्यपदाधिकारी विशाल विमल आदी उपस्थित होते. बैठकीचे संयोजन महाराष्ट्र अंनिस शिवाजीनगर पुणे शाखा, आकुर्डी, चाकण आणि जिल्हा शाखेने केले होते. या बैठकीत मागील चार महिन्यांचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला. पुढील चार महिन्याचे नियोजन यात सक्षम शाखा सक्षम संघटना यावर विचार मंथन होवून संघटनात्मक विस्तारासाठी नियोजन करण्यात आले. आवश्यक ते महत्त्वपूर्ण ठराव ही करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य पदाधिकारी, जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा प्रधान सचिव आणि सक्रिय प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments