आगीत शेतमजुराचे घर जळून खाक* *आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून दिलासा*

 *आगीत शेतमजुराचे घर जळून खाक* 

*आ रमेशआप्पा कराड यांच्याकडून दिलासा*           रेणापूर तालुक्यातील मौजे सेवादासनगर येथील दगडू लक्ष्मण चव्हाण या शेतमजुराच्या घराला बुधवारी सकाळी शॉर्ट सर्कीटमुळे अचानक आग लागून घरातील सर्व साहित्य, अन्नधान्य, कपडे, पैसे जळून खाक झाले सदर घटनेची माहिती मिळताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड यांनी सेवादास नगर येथे जाऊन आपदग्रस्त कुटुंबाला संसार उपयोगी सर्व भांडी कुटुंबाला लागणारे सर्व कपडे अंथरूण - पांघरूण आणि किराणा साहित्य देऊन दिलासा दिला. आगीत भस्मसात झालेल्या घराची पाहणी केली

             सकाळच्या वेळी लागलेली आग सेवादास नगर येथील नागरिकांनी विझवण्याचा प्रयत्न केला मात्र या आगीत मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या दगडू चव्हाण यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले या दुर्दैवी घटनेचे सर्वत्र हळहळ होत असून भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांनी आपद्ग्रस्त कुटुंबाला माणुसकीच्या या नात्याने मदत करून मोठा आधार दिला. आगीत नुकसान झालेल्या घराच्या प्रश्नबाबत मदत केली जाईल असे वचन देऊन दिलासा दिला

              आ रमेशआप्पा कराड यांच्यासमवेत यावेळी रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेकभैय्या अकनगिरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, ओबीसी आघाडीचे मराठवाडा संपर्क प्रमुख डॉ बाबासाहेब घुले, माजी उपसभापती आनंत चव्हाण, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत करमुडे, रेनापुरचे शहराध्यक्ष दत्ता सरवदे नगरसेविका सौ.जमुनाबाई राठोड, पाणी पुरवठा सभापती उज्वल कांबळे, माजी बांधकाम सभापती विजय चव्हाण, कृष्णा मोटेगावकर, दिनकर राठोड, चंद्रकांत कातळे, महेश गाडे, अंतराम चव्हाण, रमेश चव्हाण, लखन आवळे, अजीम शेख, बाबू राठोड शालिक गोडभरले, सचिन लोकरे परमेश्वर मोटेगावकर शेषराव पवार, अनिल जाधव, शरद जाधव, सुभाष राठोड, राजेंद्र जाधव यांच्यासह सेवादास नगर येथील महिला पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments