अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न


    औसा प्रतिनिधी

   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमर खानापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रेंड्स क्लब औसा आणि अमर खानापुरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 1 मार्च मंगळवार रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत श्री कुमार स्वामी महाविद्यालया च्या पाठीमागे कलावती व्हील अलायमेंट च्या जवळ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फ्रेंड्स क्लब औसा आणि अमर खानापुरे युवा मंच यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे हे सलग 24 वे वर्ष आहे. रक्तदानाचा माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेत रक्त देता यावे या उदात्त हेतूने फ्रेंड्स क्लब ने ही परंपरा कायम राखली असून आपण आपला वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने करून वाढदिवसाच्या निमित्ताने इच्छुक रक्तदात्यांना रक्तदान करून राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदवावा अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे औसा शहर व परिसरातील इच्छुक रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष फ्रेंड्स क्लब औसा व अमर खानापुरे युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले होते.त्या अनुषंगाने या शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना संजीवनी ब्लड बँक च्या वतीने अमर खानापुरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.यावेळी संजीवनी ब्लड बँक चे संचालक बालाजी जाधव, जनसंपर्क अधिकारी रोहीणी कातळे,तंत्रज्ञ श्रीदेवी कांबळे,स्नेहा मुळे,महादेवी जोगदंड, करिष्मा कांबळे, मंदाकिनी महापुरे यांनी सहकार्य केले.यावेळी या शिबिरामध्ये  दतोंपंत सुर्यवंशी,  शकीलभाई शेख, हनमंत भैया राचट्टे,प्रा.सुधीर पोतदार जयराज कसबे,अंगद कांबळे,खुंदमीर  मुल्ला , सुलतान शेख,दिपक राठोड, सुरेश सुर्यवंशी,बबन बनसोडे, हमीद सर खाजा शेख,राजु शेख,अनवर सय्यद,गोपाळ धानुरे,समीर डेंग,धम्मदिप जाधव आदिंची उपस्थिती होती.या रक्तदान शिबिराला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फ्रेंड्स क्लब औसा आणि आमर खानापुरे युवा मंचचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments