लातूर शहरानजीकच्या गावांना जोडणाऱ्या* *रस्त्यांच्या कामांचा १६ आणि १७ मार्च रोजी* *शुभारंभ

 *लातूर शहरानजीकच्या गावांना जोडणाऱ्या* *रस्त्यांच्या कामांचा १६ आणि १७ मार्च रोजी* *शुभारंभ**२ कोटी ७५ लाख रुपये खर्चाची योजना*


 


लातूर (प्रतिनिधी)_ लातूर शहर मतदारसंघातील विविध गावांना लातूर शहराची जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत  १६ आणि १७ मार्च २०२२ रोजी करण्यात येत असून यात ९ रस्त्यांची कामे होणार असून यावर तब्बल २ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत.


मागच्या दोन वर्षातील कोविड प्रादुर्भाव आणि त्यामुळे आलेले निर्बंध यामुळे  विकास प्रकियेची  गती मंदावली होती . आता करोनाचे सावट  दूर झाले असून विकास प्रक्रियेला  गती देण्यात येत आहे.  या प्रक्रियेचाच  एक भाग म्हणून लातूर शहरानजीकच्या गावास  लातूर शहराशी जोडणाऱ्या एकूण ९ रस्त्याच्या कामाचा शुभारंभ १६आणि १७ मार्च २०२२ रोजी करण्यात येत आहे.  या शुभारंभ कार्यक्रमास शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड किरण जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल व विजय देशमुख, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके आणि जि. प.सदस्य पंडित ढमाले सौ  सोनाली रमेश थोरमोटे, सौ. साधना सुभाष जाधव, पंचायत समितीच्या सभापती सौ सरस्वती नामदेवराव पाटील उपसभापती  प्रकाश उफाडे, पंचायत समितीचे सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


बुधवार दिनांक १६ मार्च रोजी २ वाजता खाडगाव येथे खाडगाव ते  रिंग रोड, दुपारी ३ वाजता वासनगाव येथे वासनगाव ते राज्य मार्ग २४३, सायंकाळी ४ वाजता गंगापूर येथे गंगापूर ते पाखरसांगवी, सायंकाळी ५.३० वाजता कातपूर येथे कातपूर ते लातूर आणि सायंकाळी ६. ३० वाजता बाभळगाव येथे बाभळगाव ते राज्य मार्ग २३५ या रस्त्याच्या मजबूतीकरण आणि डांबरीकरण कामाचा शुभारंभ होणार आहे. 


दिनांक १७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजता खंडापूर येथे खंडापूर ते राज्य मार्ग २४२ ,सकाळी १० वाजता आखरवाई येथे आखरवाई ते विमानतळ, सकाळी ११ वाजता भामरी  येथे भामरी चौक ते रिंग रोड चौक आणि दुपारी १२ वाजता साई येथे साई ते  गव्हाण या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे.


 या शुभारंभ कार्यक्रमास लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या असून ,  रस्ते मजबुतीकरण शुभारंभ कार्यक्रमास त्या त्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्वश्री रमेश थोरमोठे , रामराजे चामे, सतीश कानडे, तानाजी फुटाणे, लालासाहेब देशमुख, विष्णु देशमुख, गोविंद देशमुख, सुभाष जाधव, संजय  पाटील, आनंत बारबोले, पंडित ढमाले, बिरू सरवदे, ज्ञानेश्वर पवार, अमोल पवार यांच्यासह गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


                                                     ----------------------------------------

Post a Comment

0 Comments