माधुरी भुरे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

 माधुरी भुरे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार


 औसा प्रतिनिधी 

जिल्हा परिषद प्रशाला नागरसोगा ता. औसा येथील गणित विषयाच्या शिक्षिका श्रीमती माधुरी भुरे यांना लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार देण्यात आला. माधुरी भुरे या उपक्रमशील शिक्षिका असून नागरसोगा जिल्हा परिषद प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने गणित विषय शिकविण्याचे कार्य करीत शैक्षणिक कार्य सोबतच इतर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करणाऱ्या माधुरी भुरे या लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी ठरल्या .त्यांच्या या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच सरपंच सौ सरोजा सूर्यवंशी, उपसरपंच बंडू मसलकर, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य भास्कर सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांच्या या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments