......
पालिकेसमोर तीन तास केले ठिय्या आंदोलन
....
तात्काळ रचना बदला प्रभाग एक मधील नागरीकांची मागणी
....
औसा ः दोन दिवसांपुर्वी औसा शहरातील प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. या रचनेमध्ये मोठे फेरबदल झाल्याचे दिसुन येते. सदर प्रभाग रचना संदर्भात येथील फुले नगर, बौद्ध नगर, भिम नगर,संजय नगर मधील नगरीकांनी प्रारुप प्रभाग रचनेच्या विरोधात आपला रोष व्यक्त करीत नगरपालिकेच्या समोर दि. ११ रोजी तीन तास ठिय्या अंदोलन केले. प्रभाग रचना करतांना पालिकेच्या तज्ञ कर्मचाऱ्याची कमीटी करुन निवडणुक आयोगाच्या निकषा प्रमाणे ही रचना करणे अपेक्षीत होते मात्र सदर रचना करतांना खाजगी व्यक्तींना रचनेत समाविष्ट केल्याचा आरोप करीत नागरीकांनी पालिकेला धारेवर धरले. तात्काळ ही प्रभाग रचना बदला अशी मागणी या भागातील नागरीकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली.
ओबीसी आरक्षणावरुन राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिकेच्या निवडणुकीचा तिढा निर्माण झाला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय होणार नाहीत असा पवित्रा सत्ताधारी व विरोधकांनी घेत विधीमंडळात सहा महीने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यात प्रभाग रचनेसह इतर अधिकार सरकारकडे ठेवित नव्याने रचना होणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले. सदर प्रभाग रचनेच्या संदर्भात पुर्वी मिळालेल्या निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रारुप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरु झाली. सरकारने घेतलेल्या निर्णया संदर्भात निवडणुक आयोगाने कुठलेच आदेश न दिल्याने प्रारुप प्रभाग रचना प्रक्रिया नियमीत करण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक विभागाने हाती घेतली. याच अनुषंगाने प्रारुप प्रभाग रचनेची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात प्रथमच प्रभाग व नगरसेवकांची संख्या वाढल्याने मोठे फेरबदल दिसुन आले. प्रभाग रचनेत राजकीय पक्षांनी कस लावल्याचे यात अढळुन येते. म्हणुनच आनेक प्रभागातील गल्ल्या बोळे हे इकडे तिकडे करण्यात आले आहे. यामुळे शहरात दोन दिवसांपासुन जोरदार चर्चा सुरु होती. आता या प्रारुप प्रभाग रचनेला असंतोषाचे ग्रहण लागले आहे. प्रभाग एक मधील बौद्ध नगर, महात्मा फुले नगर, संजय नगर, भिम नगर येथील नागरीकांनी आरक्षीत असनाऱ्या आपल्या प्रभागाला इतर प्रभागातील कांही भाग जोडला असल्याचे कारण देऊन २०११ च्या जनगणने नुसार आडीच हजार मागसवर्गीय लोकसंख्या असलेला भाग हे कारण देत. यात प्रभाग सात मधील धनगर गल्ली व पाटील गल्ली असा भाग जोडल्याने अन्याय झाल्याचे या अंदोलना दरम्यान सांगण्यात आले. प्रभाग रचना करतांना मुख्याधिकारी यांनी तज्ञ कर्मचारी यांची नियुक्ती करुन पारदर्शी व गु्प्त पद्धतीने प्रभाग रचना करणे आवश्यक होते तसे झाले नाही. प्रभाग रचना करतांना शहरातील कांही खाजगी व्यक्तींना सोबत घेऊन निवडणुक आयोगाच्या कार्यालयात रचना करण्यात आल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन नव्याने रचना करण्याची मागणी या भागातील नागरीकांनी अंदोलना दरम्यान मुख्याधिकाऱ्यांकडे केले.
.......राष्ट्रवादीही अंदोलनात......
या अंदोलना दरम्यान प्रभाग एक मधील नगरीकांसोबत प्रभागातील कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका अॅड मंजुषा हजारे तसेच अंगद कांबळे हे ही उपस्थित होते. तसेच प्रभाग तीन मधिल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगसेविका तथा माजी उपनगराध्यक्षा किर्ती कांबळे यांनीही आरक्षीत प्रभागातील अन्याया विरोधात या अंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवित आपला पाठींबा दिला. यामुळे या अंदोलनाला राष्ट्रवादीचाही पाठींबा पाहायला मिळाला.
0 Comments