वसीमभैया खोजन मित्रमंडळचा कौतुकास्पद उपक्रम

 वसीमभैया खोजन मित्रमंडळचा कौतुकास्पद उपक्रम


औसा प्रतिनिधी

औसा शहरातील स्वर्गीय फैजुल आलम खडकाळे यांच्या स्मरणार्थ व वसीम भैया खोजन मित्रमंडळच्या वतीने  कैकाडी गल्ली येथील श्री  संत राजाराम महाराज,समाज मंदीर येथे पूर्ण बाॅडी चेक अप कॅम्प व रोग निदान शिबिराचे आयोजन 2 मार्च बुधवार रोजी करण्यात आले होते.या रोगनिदान शिबिरामध्ये शुगर,बीपी,रक्तगट, वजन,हाईट,रक्ताची तपासणी सीबीसी व कॅम्पिटर द्वारे पूर्ण बाॅडी चेक अप  व रोगनिदान शिबिर 10 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात आले.वसीमभैया खोजन मित्रमंडळ यांनी विविध उपक्रम घेऊन एक सामाजिक कार्य करीत आहेत.

या शिबिरामध्ये औसा शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सोयी करिता पूर्ण बाॅडी चेक अप व रोगनिदान शिबिराचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन वसीम भैया खोजन मित्रमंडळचे अध्यक्ष वसीम खोजन यांनी केले आहे.

यावेळी या शिबिराचे शुभारंभ उलमा-ए-हिंद चे मौलाना नाजीमसाब यांच्या प्रमुख उपस्थितीत, करण्यात आले.

यावेळी या शिबिरामध्ये नागरिक व महिलांनी  मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घेतला.या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.

या शिबिरामध्ये पूर्ण बाॅडी चेक अप कॅम्प व रोगनिदान शिबिराचे महेबुब खडकाळे, चंद्रकांत जाधव, युसुफ शेख,रमा टोपे,समीर खडकाळे, योगेश कल्याणी किर्ती बनसोडे, ओमकार शिवरे यांनी या शिबिरामध्ये सहकार्य केले.

या शिबिराला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अकबर भैया खोजन,आजम खोजन,नदीम सिद्दीकी,अजहर खोजन, इस्माईल पठाण, अस्लम खोजन,सलीम शेख, इस्माईल शेख, जुबेर खोजन,ताजोद्दीन शेख, सलमान शेख, फैयाज शेख आदिंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments