आप चे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली पंजाबमध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ
चंदीगड: पंजाबमध्ये आता आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री बनला आहे.आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या 25 व्या मुख्यामंत्रीपदाची शपथ घेतली.राज्यपाल बन्वारीलाल पुरोहित यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.भगतसिंग यांचे पंजाबमधील वडीलोपारजित गाव खटकर कलान येथे हा शपथविधी सोहळा पार पडला.यावेळी आप चे अध्यक्ष आणि दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षातील आणि कुटुंबातील काही मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांना बोलावण्यात आले नव्हते.विशेष म्हणजे, कोणत्याही केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही मोठ्या नेत्यांना शपथ विधी साठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.
या शपथविधी सोहळ्याची विशेष बाब म्हणजे ज्या लोकांना या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते.त्यात पुरुषांना पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांसाठी पिवळ्या रंगाच्या ओढण्या परिधान करण्याचे आवाहन केले गेले होते.
भगतसिंग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिवळ्या रंगाला प्राधान्य देण्यात आले होते.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारुन दणदणीत विजय मिळवला.
दिल्लीच्या बाहेर प्रथमच आप ने एक हाती सत्ता मिळवली आहे.पंजाबच्या निकालातुन आम आदमी पक्षाने काॅग्रेस, भाजप,अकाली दल या सर्वांना धूळ चारत पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंतसिंग मान यांनी सुमारे 45 हजारांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवत काॅग्रेसला पराभवाची धूळ चारली.
तर, नवज्योतसिंग सिध्दु, कॅप्टन अमरिदर सिंह, चरणजित सिंह चन्नीसह अनेक दिग्गज काॅग्रेस नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला.
0 Comments