शिव कथा व ज्ञान यज्ञ सोहळ्यास भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद


 शिव कथा व ज्ञान यज्ञ सोहळ्यास भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद औसा प्रतिनिधी 

औसा येथील नरहरे कॉलनीच्या भाविक भक्तांच्या पुढाकाराने नरहरे कॉलनी येथे भव्य शिवकथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे कथाकार म्हणून आशिष आनंद महाराज धारूरकर यांनी शिव कथा कार्यक्रमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले .या शिवकथा सोहळ्यामध्ये शिव पार्वतीचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. आणि या शिव कथा सोहळ्यामध्ये महादेव पार्वती च्या विवाह सोहळ्याचे आकर्षक वेशभूषा करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या अमृतवाणीतून पूज्य आशिष आनंद महाराज धारूरकर यांनी शिव कथा कार्यक्रमातून शिवभक्तांना मंत्रमुग्ध केले.या शिवकथा सोहळ्यासाठी शहरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरहरे कॉलनीतील सर्व रहिवाशांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments