औसा तहसीलकडून जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

 औसा तहसीलकडून जागतिक ग्राहक हक्क दिन साजराऔसा- दि 15 मार्च 2022 रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.

औसा प्रतिनिधी

ग्राहकांना त्याचे हक्क व जबाबदारी  याबाबत  मार्गदर्शन आणि उदघाटक एन जी माळी, सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत लातूर जिल्हा यांनी केले.कार्यक्रमाचे सुरुवातीस कु. संस्कृती वागदरे, व श्रुष्टी सगरे या विध्यार्थीनींनी ग्राहक दिनाबाबत भाषण केले,त्यांनीही ग्राहकाच्या काय जबाबदाऱ्या आहेत,त्यांनी वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी हे सांगितले यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी  Fair Digital Finance या थीम बाबतचे फायदे,तोटे,तसेच त्या बाबत ग्राहकाने कसे जागरूक रहावे याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी ग्राहक दिनावर भाषण केलेल्या मुलींना 

भाषण केलेल्या विध्यार्थीनी याना पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांच्यातर्फे मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments