शेषराव कोरे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी पुरस्कार


 शेषराव कोरे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी पुरस्कार 

औसा प्रतिनिधी

 औसा तालुक्यातील हासेगाव येथील प्रगतिशील व कष्टाळू शेतकरी शेषेराव गोविंदराव कोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पुष्पा शेषराव कोरे यांना 2019 - 20 या सालाचा लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शेतकरी पुरस्कार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा शुभास्ते देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे जिल्हा परिषदेचे भाजप गटनेते महेश पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिप उपाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हासेगाव येथील शेतकरी शेषराव कोरे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष तसेच वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे श्री भीमाशंकर बावगे वेताळेश्वर बावगे शिवलिंग जेवढे दिलीप लवटे गोपाळ लवटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments