कोरोना काळात गावपातळीवर विशेष कार्य केलेल्या महिला कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा


 कोरोना काळात गावपातळीवर विशेष कार्य केलेल्या महिला कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा

औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील शिवली येथे जागतिक महिला महिला दिनाच्या निमित्ताने महिला बाल विकास विभाग लातूर व ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान बुधोडा महिला संचालित समुपदेशन केंद्र, पोलीस ठाणे औसा,एम एस आर एल एम उमेद अभियान पंचायत समिती औसा अभय केंद्र औसा महिला समुपदेशन मदत केंद्र पंचायत समिती औसा यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात गावपातळीवर उल्लेखनीय कार्य केलेल्या आशा कार्यकर्ती व अंगणवाडी कार्यकर्ती आणि अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 14 कार्यकर्तीचा सन्मान सोहळा करण्यात आला.या प्रसंगी रविचंद्र वंजारे समुप्रदेशक यांनी महिला विषयक सुरक्षा कायदे विषयी मार्गदर्शन केले.तसेच प्रविण चपटे महिला संरक्षण अधिकारी यांनी अभय केंद्र विषयी माहिती दिली.या सन्मान सोहळ्यात अंगणवाडी चे कार्यकर्ती श्रीमती रईसा तांबोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या सोहळ्यासाठी साधारणपणे 90 ते 100 महिला ची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात तालुका समन्वयक उमेदचे किशोर आकुडे, बॅंक ऑफ बडोदा व्यवस्थापक डी एस हिप्परकर शिवली या मान्यवरांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पूनम भोळे यांनी केले.या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समुप्रदेशक रणधीर धुमाळ,  गट समन्वयक उमेदचे निवृत्ती भुत्ते औसा यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments