आम आदमी पार्टीचा विजयाचा औसा येथे जल्लोष

 आम आदमी पार्टीचा विजयाचा औसा येथे जल्लोष


औसा मुख्तार मणियार

मागील महिन्यात झालेल्या पांच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंजाब राज्यामध्ये आम आदमी पार्टीला भरभरून यश आल्यामुळे औसा येथे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी औसा तहसील कार्यालयासमोर आप'च्या जनसंपर्क कार्यालय येथे पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.यावेळी पंजाब विधानसभा सभेची जी निवडणुक या ठिकाणी झाली.जवळपास चार पाच राज्यांच्या निवडणूका झाल्या.त्याच पंजाबमध्ये  आम आदमी पार्टीला जो भरभरून यश जवळपास 92 जागा मिळवून त्या ठिकाणी पार्टी सत्तेवर आलेली आहे. खरं म्हणजे आम आदमी पार्टीचे-हदय सम्राट अरविंद केजरीवाल जे काम दिल्लीमध्ये केले तेच काम या संपूर्ण देशामध्ये करण्याचे मानस मनामध्ये ठेऊन ते या ठिकाणी कार्यरत आहेत.हे त्यांचा कार्याला ख-या अर्थाने पंजाबच्या जनतेने आज मोठ्या प्रमाणात यश देऊन एक हा पक्ष सर्व भारतामध्ये कश्या पद्धतीने वाढेल हा एक संकेत या ठिकाणी दिलेला आहे. खरं म्हणजे हाच एक संकेत घेऊन काम करण्याची गरज आहे आम्ही त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. खरं म्हणजे फुले सेवा आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी सामान्य माणसाचे वजन वाढलं पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे हि भूमिका घेऊन पुढील काळामध्ये आम्ही काम करणार आहोत.असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष अॅड अनिल मोरे यांनी आनंदोत्सव साजरा करताना केले.यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले, शहराध्यक्ष अहेमद शेख, मिडिया प्रमुख मुख्तार मणियार, उपशहाराध्यक्ष अली कुरेशी, सचिव सय्यद अमीर,अमित पांडे, अॅड भाऊराव सगट, अॅड जी पी बिराजदार, अॅड रूपेश सुरवसे, अॅड अनील शिवलकर, अॅड हर्षद जाधव, अॅड गणेश कुसुमकर, अॅड एकनाथ कांबळे, अॅड निजाम पटेल, शिवाजी जाधव,जाफर शेख, मोहम्मद समीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments