औश्यात राष्ट्रवादीचे झोपा काढो आंदोलन करण्याचे आयोजन

 औश्यात राष्ट्रवादीचे झोपा काढो आंदोलन करण्याचे आयोजन


औसा प्रतिनिधी

औसा नगर परिषद प्रशासनानाच्या कर्तव्य शून्य कारभारा विरोधात व झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रतिकात्मक झोपा काढो आंदोलन दिनांक 1 एप्रिल 2022 शुक्रवार रोजी औसा तहसील कार्यालयासमोर माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हा लातूर ग्रामीण चे कार्याध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी झोपा काढो आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे.

या झोपा काढो आंदोलनात त्यांनी पत्रीकामध्ये 

मालमत्ता धारक व नळ धारक यांची सक्तीची व जाचक कर वसुली थांबवावी.

औसा शहरातील स्वच्छतेची कामे दुपार सत्रात व नाईट स्विपींग पूर्वी प्रमाणे चालु ठेवावी.

शहरातील बंद लाईट चालू करणे व हद्दवाढ परिसरात तार ओढणे.

साईड अॅड सर्व्हिसेस येथील पाणी टाकी चालू करून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करावा.

स्पर्धा परीक्षा केंद्र येथे पुस्तके व वर्तमानपत्रे ठेवावे.

नागरिकांना त्रास देणाऱ्या नगर रचनाकार कर्मचाऱ्यांस निलंबित करावे.

औसा नगर परिषद काॅन्सीलने घेतलेल्या विकास कामांच्या ठरावाची अंमलबजावणी करावी.

प्रशासक यांच्या नगरपालिकेत अवैध हस्तक्षेप थांबवावी.

पावसाळा सुरु होण्यापूर्वी मोठ्या गटारिची साफसफाई करण्यात यावी.

नविन 10 बोअरवेल ची डिमांडची रक्कम महावितरण कडे भरावी, बंद असलेल्या घंटागाड्या दुरुस्त कराव्या.

मोमीन गल्ली येथील व शहरातील नळांना पाणी सुरळीत करावे.

नळास पाणी न येणारे व बंद असलेल्या नळाची नळपट्टी माफ करावी,अश्या मागणीचे पत्रीका जारी केले आहे.व तसेच नळाला खुट्टया माराल तर..आणि जप्ती कराल तर असा इशारा राष्ट्रवादी तर्फे एका पत्रीकाद्वारे झोपा काढो आंदोलन करण्याची माहिती माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments