महाशिवरात्री निमित्त मुक्तेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी


 महाशिवरात्री निमित्त मुक्तेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी औसा प्रतिनिधी

 औसा शहराचे ग्रामदैवत आणि शिवभक्तांचे श्रद्धास्थान श्री मुक्तेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त दिनांक 1 मार्च रोजी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ सुरू होती महाशिवरात्री निमित्त शिवालयात चे दर्शन घेण्यासाठी महिला व आबालवृद्धांसह सर्व भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. मंदिर समितीच्या वतीने भक्तगणांना दर्शन रांगेत शिस्तीत घेता यावे म्हणून व्यवस्था केली होती. तसेच येथील  ्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्‍वविद्यालयाच्या राज योग शिक्षण केंद्र च्या वतीने श्री मुक्तेश्वर मंदिर परिसरात स्टॉल लावून महाशिवरात्रीचे महत्व येथील राजे योगिनी शिवभक्तांना समजावून सांगत होत्या मंदिर समितीच्या वतीने मंदिरात आणि शिखरावर आकर्षक विद्युत रोषणाई तसेच गार्डन परिसरात आकर्षक कारंजे आणि मंडप टाकून भाविकासाठी व्यवस्था करण्यात आली आहे अवसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्तांना सिटी दर्शन घेता यावे म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. आज दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 11 पासून रात्री आठ वाजेपर्यंत सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भक्तांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही ऍड मुक्तेश्वर वाघदरे अध्यक्ष मंदिर समिती यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments