औशात 64 वा वर्धापन दिन एमआयएम पक्षाकडून साजरा..

 औशात 64 वा वर्धापन दिन एमआयएम पक्षाकडून साजरा.. औसा प्रतिनिधी


औसा /प्रतिनिधी : - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम पक्षाचा 64 वा वर्धापन दिन शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दि. 2 मार्च 2022  बुधवार रोजी सकाळी एमआयएम नेते ॲड. गफरुल्ला हाश्मी, तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर आली ईनामदार व शहराध्यक्ष अफसर शेख यांच्या उपस्थितीत शहरातील जलाल शाही चौक येथे औसा एमआयएम पक्षाच्या वतीने वर्धापन दिन कोरोना नियमांंचे पालन करत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करून साजरा करण्यात आला. यावेळी एमआयएम नेते ॲड. गफरुल्ला हाश्मी व तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली ईनामदार यांनी आपले विचार व्यक्त व्यक्त केले, तर आभार शहराध्यक्ष अफसर शेख यांनी मानले. एमआयएम पक्षाची स्थापना 1927 साली झाली. सुरुवातीला या पक्षाचा आवाका फक्त तेलंगणपुरताच मर्यादित होता.1984 पासून हा पक्ष सतत हैदराबाद लोकसभेची जागा जिंकत असतांना हा पक्ष इतर राज्यांमध्ये आपली जागा बनवत आहे. पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने देशात राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या एमआयएम पक्षाची दिवसंदिवस लोकप्रियता वाढत आहे, पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या व विकासासाठी प्रयत्न करत आहे, असे या प्रसंगी मत व्यक्त करण्यात आले.    

        यावेळी एमआयएमचे नेते ॲड. गफरुल्ला हाश्मी, तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, शहराध्यक्ष अफसर शेख, हाफिज वजीर, हारूनखाँ पठाण, मुब्बशिर इनामदार, नय्युम शेख, अझर कुरेशी, शिवराज शेख, अलीम शेख, मुशिर शेख, मुजीब शेख, शफीऊल्ला शेख, फकीरपाशा शेख, मुखीद सिद्दीकी, आवेज सिद्दीकी, अशरफबेग, मुजम्मिल शेख, कलिम सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments