जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची
27 मार्च रोजी बैठक
लातूर, दि.22 (जिमाका):- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय,लातूर येथे होणार असल्याचे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0 Comments