सार्वत्रिक 2016 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची वचनपूर्ती करा व दिलेला शब्द पाळा:औसेकरांची मागणी

 सार्वत्रिक 2016 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची  वचनपूर्ती करा

 व दिलेला शब्द पाळा:औसेकरांची मागणी


औसा प्रतिनिधी

सार्वत्रिक निवडणूक 2016 चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यानुसार नळपट्टी व घरपट्टी वरील कारवाढ 50 टक्के कमी करा व 24 टक्के व्याजदंड रद्द करा या मागणीसाठी औसेकरांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे सार्वत्रिक निवडणूक 2016 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जाहीरनाम्यामध्ये "औसा शहरातील करवाढ 50 टक्के ने कमी करणार सध्याची घरपट्टी व नळपट्टी निम्म्याहून अधिक कमी करणार व तसेच 24 टक्के व्याजदंड रद्द करणार, मागील दिड वर्षांची नळपट्टी व घरपट्टी माफ करणार भरलेल्यांना तो परत करणार आशी जाहीरनाम्याच्या पहिल्याच ओळीत नमूद केलेले आहे. मागील 5 वर्षांत नागरिकांनी घरपट्टी व नळपट्टीची भरणा केली नाही.त्यामुळे आजच्या परिस्थितीला मुद्दल कमी व व्याजदंड जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.जाहीरनाम्याची वचनपूर्ती झालेली नाही.व दिलेला शब्द  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बहुमत असताना सुद्धा पाळलेला नाही व सार्वत्रिक 2016 च्या, जाहीरनाम्याची वचनपूर्ती आद्याप झालेली नाही.व त्यामुळे जनतेत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे.व राष्ट्रवादी पक्षाने याची दखल घेतलेली नाही.व वचनपूर्ती केलेली नाही.तरी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना औसेकरांनी सन 2016 च्या जाहीरनाम्यानूसार नागरिकांची घरपट्टी व नळपट्टी व करवाढ 50 टक्के कमी करावी व 24 टक्के व्याजदंड रद्द करण्यात यावेत. या मागणीचे निवेदन सादर करताना औसा शहरातील शेख मुजम्मील महंमद साब, सय्यद मुजफ्फर अली इनामदार, खुंदमीर मुस्तफा मुल्ला,भागवत माळी यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना 28 मार्च 2022  सोमवार रोजी निवेदन सादर केले आहे.या निवेदनावर यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments