शिवली ते औसा मनसेच्या वतीने 20 किलोमीटर पायी यात्रा

 औसा तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतात गाळपा वाचुन उभ्या असलेल्या शिल्लक उसाच्या प्रश्नावर कारखानदार व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवली ते औसा २० कि.मी. पायी चालत तहसीलदारांना निवेदन सादर.............

औसा तालुक्यातील


शेतकऱ्याच्या शेतातील उसाची लागण होऊन तसेच यापूर्वी तोड झालेल्या खोडवा ऊसाला १५ ते १६ महिने उलटून गेले तरीही साखर कारखाने आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास घेऊन जात नसल्याने गाळपा वाचून शिल्लक असलेल्या उसाला तुरे फुटले असून उसाचे वजन देखील मोठ्या प्रमाणात घटले आहे तसेच अनेक शेतकऱ्यांचा ऊस फडात वाळून जात असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या चिंतेत व अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखाण्यानी आगोदर आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा आणि सभासदाचा ऊस गाळपास प्राधान्य देऊन ऊस गाळप करावा तसेच वाहन चालक आणि ऊसतोड कामगार-ठेकेदार हे शेतकऱ्याच्या शेतात ऊस तोडणीसाठी गेल्यावर शेतकऱ्याची पूजा-अर्चा च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट व पिळवणूक करत आहेत हा प्रकार देखील तात्काळ थांबविण्यात यावा तसेच शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या  उसाच्या झालेल्या नुकसानीपोटी शासनाच्यावतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक स्वरूपाची मदत करून दिलासा द्यावा या मागणीकरिता मनसे तालुका औसाच्या वतीने आज दिनांक ४ मार्च रोजी या शिल्लक उसाच्या प्रश्नाकडे शासन व कारखानदारांचे लक्ष वेधण्यासाठी ऊसउत्पादक शेतकर्‍यासंह पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवकुमार दादा नागराळे यांच्या नेतृत्वाखाली शिवली ते औसा अशी २० कि.मी. पदयात्रा काढत तहसीलदार औसा यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी तालुका सचिव धनराज गिरी,महेश बनसोडे,जीवन जंगाले,सतीश जंगाले,ईश्वर परिहार, प्रकाश,भोंग,नवनाथ माचवे,निळकंठ तात्या भोंग,अमोल थोरात,वरून देशपांडे, किशोर आगलावे,तानाजी गरड,अभिषेक सूर्यवंशी,बाळू सोलाने, दाजी देवसिंगकर, महादेव गुरुशेट्टे, गोविंद चव्हाण,निवास मुळे, प्रदीप बनसोडे, प्रल्हाद बनसोडे, सुर्यकांत चव्हाण, मुझबोदिन तांबोळी, समाधान फुटाणे,गुणवंत लोहार, अनंत भिसे,रामभाऊ जंगाले,रमेश जावळे,विक्रम जंगाले, महेश पाटील, प्रविण सुरवसे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments