नविन हद्दीतील गुंठेवारी आकारणी 10 रु चौरस फूट प्रमाणे करा: शेख मुजम्मील

 नविन हद्दीतील  गुंठेवारी आकारणी 10 रु चौरस फूट प्रमाणे करा: शेख मुजम्मील


औसा प्रतिनिधी

गेल्या वर्षी औसा शहराची हद्दवाढ होऊन बराचसा भाग नगरपरिषद हद्दीत समाविष्ट करण्यात आलेला आहे.नविन हद्दीतील प्लांट धारकांना नगरपरिषदेत नांव नोंदणी करण्याकरिता गुंठेवारी पध्दतीने पैसे भरुन घेऊन नांव नोंदणी करणे चालू आहे.परंतू शासकीय नियमाप्रमाणे 30 रु प्रती चौरस फूट गुंठेवारी आकारणी आसतांना नगरपरिषदेने बहुमताने ठराव घेऊन 30 रु प्रती चौरस फूट आकारणी करण्याचे ठरविले आहे.या बाबतची माहिती औसेकरांना वर्तमानपत्रातून मिळाली आहे.

परंतु आपल्या कार्यालय मार्फत ठरावाला बगल देऊन गुंठेवारी आकारणी 30 रु चौरस फूट प्रमाणे आकारण्यात येत आहे.जे जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहे.ज्यामुळे नविन हद्दीतील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.तरी सदर अर्जाची दखल घेऊन नगरपालिकेने बहुमताने घेतलेल्या ठरावानुसार नविन हद्दीतील प्लांट धारकांना गुंठेवारी आकारणी 10 रु प्रती चौरस फूट प्रमाणे आकारण्यात यावी.व गुंठेवारी आकारणी बाबत घेण्यात आलेल्या ठरावात प्रमाणित प्रत मला देण्यात यावे.या मागणीसाठी शेख मुजम्मील महंमद औसा यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिनांक 9 मार्च 2022 बुधवार रोजी निवेदन सादर केले आहे.


Post a Comment

0 Comments