आलमला रोड वरील नाल्या तुंबल्या मुळे नागरिक त्रस्त

 आलमला रोड वरील नाल्या तुंबल्या मुळे नागरिक त्रस्त


 औसा प्रतिनिधी

 औसा शहरातील आलमला रोडच्या बाजूच्या दोन्ही नाल्यांमध्ये कचरा आणि गाळ साचल्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून महात्मा फुले नगर आणि भीम नगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसुला फड स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी नालीतील गाळाचा उपसा करण्याची मागणी करूनही नगरपालिका कर्मचारी व स्वच्छता विभाग या कामी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरातील नागरिक वैतागले आहेत. मुख्याधिकारी व नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने सूचना देऊन या परिसरातील नालीतील गाळाचा उपसा करून नागरिकांचे आरोग्य रक्षण करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments