लातूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष व त्यांच्या सहकार्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या: खुंदमिर मुल्ला
औसा प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी लोकसभेत महाराष्ट्र राज्याने देशात कोरोना पसरविले असे मत व्यक्त करून महाराष्ट्र राज्याचे अपमान केल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राज्यातील भाजपा पक्षाच्या खासदार यांच्या घरासमोर लोकशाही पद्धतीने आंदोलन करून मोदीजी यांचे निषेध करण्यासाठी व मा. नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्र राज्याची माफी मागावी .या प्रमुख मागणीसाठी दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रविवार रोजी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या घरासमोर लातूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते पण एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूर यांनी कोरोना महामारीचा अहवाल देऊन काँग्रेस जिल्हाध्यक्षासह इतरावर गुन्हे नोंद केले आहेत .सध्या राज्यात कोरोना. महामारी चे प्रादुर्भाव कमी झाला असून व सर्व बाबी सुरळीतपणे चालू असताना चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंदविण्यात आले आहे. तरी या बाबत गुन्हे नोंद केलेली त्वरित मागे घेण्याची सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी करावी.या मागणीसाठी विलासराव देशमुख युवा मंच औसाच्या वतीने दि.22 फेब्रुवारी 2022 मंगळवार रोजी औसा तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे.यावेळी निवेदन देताना आर एस बनसोडे, प्रवीण चव्हाण,दिपक कांबळे,प्रसाद फुटाणे, गणेश गोरोबा कांबळे आदि उपस्थित होते.
0 Comments