शिवणी लख येथे बचत गटातील महिलांनी दारुचे दुकान उध्वस्त केले

 शिवणी लख येथे बचत गटातील महिलांनी दारुचे दुकान उध्वस्त केले


औसा प्रतिनिधी 

शिवणी लख ता. औसा जिल्हा लातूर येथे गेल्या कित्येक दिवसा पासून काही राजकीय पुढारी आणि पोलीस यांना हप्ते देऊन अवैध दारू विक्री चालू होती त्यामुळे गावातील तरुण पिढी वेसानाधिन होत होती व कितेक संसार उघड्यावर आले होते. म्हणून महिला बचत गटाने जिल्हाधिकारी साहेब लातूर आणि आणि जिल्हा पोलिस अधीक्षक लातूर यांना 14/02/2022 ला दारू बंदी साठी निवेदन देऊन सुधा त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून गावातील महिलांनी एकत्र येऊन एकजुटीने दारू चे दुकान फोडले आणि दारू विक्रेत्यास चपल ने चोप दिला,

शिवणी (लख) गावातील बहादुर महिलांनी एकत्र येऊन जे काम केलं आहे तेच काम आता तालुक्यातील सर्व गावांमध्ये महिला बचत गटाचा दारू दुकान फोड पॅटर्न म्हणून राबवला पाहिजे अशी प्रतिक्रिया समाज माध्यमातून येत आहेत.

 ग्रामपंचायत ने जे काम करायला पाहिजे होत ते त्यांना जमल नाही पण गावातील महिलांनी ते काम आज दारू दुकान फोडून करून दाखवलं आहे खऱ्या अर्थाने आज महिलांनी क्रांती ची मशाल पेटवली आहे ती मशाल आता संपूर्ण महाराष्ट्र भर महिला बचत गट दारू दुकान फोड पॅटर्न म्हणून सर्व गावांमध्ये पेटवली पाहिजे,अशी माहिती मारुती विठ्ठल जोगी शिवणी लख चे ग्रामस्थ यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments