उजैनी मठाचे श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम येथील चालू हंगामातील उत्पादित ६ लाख ६१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन

 *उजैनी मठाचे श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम येथील चालू हंगामातील उत्पादित ६ लाख ६१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन


*

औसा प्रतिनिधी


श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना मुरुम येथे उजैनी मठाचे श्री श्री श्री १००८ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते चालू हंगामातील उत्पादित ६ लाख ६१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले.विठ्ठलसाई कारखान्याला काशी पिठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सदिच्छा भेट देवून शुभ आशीर्वाद दिला.यावेळी कारखान्याचे चेअरमन तथा प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील,शरणय्या स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव दिलीप भालेराव, कारखान्याचे संचालक केशव पवार, विठ्ठलराव पाटील, माणिकराव राठोड, संगमेश्वर घाळे, शिवमुर्ती भांडेकर गुरुजी, कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, अँड. व्ही. एस. आळंगे, नगराध्यक्षा अनिता अंबर, सौ रणखांब प. स. सभापती लोहारा, माजी नगराध्यक्ष मुळे लोहारा, माजी नगराध्यक्ष रशिद शेख आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाटील तर आभार विठ्ठलराव बदोले यांनी मानले. या परिसरातील शेतकरी, सभासद, कारखान्यातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments