औसा येथे अभिमन्यू पवार यांचा जनता दरबार यशस्वीपणे संपन्न


 औसा येथे अभिमन्यू पवार यांचा  जनता दरबार यशस्वीपणे संपन्न


औसा प्रतिनिधी

औसा तालुक्यातील नागरिकांचे रखडलेली कामे  प्रश्न मार्गी लावण्यासाठी औसा तहसील कार्यालय येथील प्रशासकीय इमारत येथे महाराजस्व अभियाना अंतर्गत विविध विभागाच्या प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित केला होता. जवळ्पास सहा तास चाललेल्या या मॅरेथॉन जनता दरबारात शेकडो शेतकऱ्यांनी नागरिकांनी उपस्थित राहून त्यांचा पिकविमा,महावितरण,कृषी, महसूल, जलसंधारण, पाणीपुरवठा,मनरेगा शिक्षण,भूमिआभिलेख , सार्वजनिक बांधकाम प्रश्न विषय जागेवरच मार्गी लावले तर उर्वरित प्रश्न विषय कालबध्द पणे मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

मतदार संघातील सर्व शेतकरी बांधवांना गोठा, शेततळे, सेंद्रिय खत, निर्मिती प्रकल्प असे लाभ देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी मी मनरेगा तून ग्रामसमृध्दी या अभियानावर काम करतो आहे.याच प्रयत्नाचा भाग म्हणून आज एकाच दिवशी औसा तालुक्यातील 300 लाभार्थी शेतकऱ्यांना  गोठा मंजूरीच पत्र प्रतिनिधित्व स्वरुपात वितरित केले आहे.पण त्यात कुशल-अकुशल चे प्रमाण सुधारते की गोठ्यांची संख्या शेकडो वरुन हजारोत जाईल हे मात्र नक्कीच.यावेळी काही कुटुंबांना शिधा पत्रिकाही वितरित केल्या.या जनता दरबारात उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सुर्यवंशी,औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसुधाताई फड, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे,नायब तहसीलदार काबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, महावितरण चे अभियंता जाधव यांच्यासह विविध विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments