खासदार असोदीन ओवेसी यांच्यावरील जीवघेणा हल्ला करणारे समाजकंटकांवर कडक कारवाई करा : एम आय एम ची मागणी

 खासदार असोदीन ओवेसी यांच्यावरील जीवघेणा हल्ला करणारे समाजकंटकांवर कडक कारवाई करा : एम आय एम ची मागणी


औसा प्रतिनिधी

 खासदार असोदीन ओवेसी यांच्यावरील जीवघेणा हल्ला करणारे समाजकंटकांवर कडक कारवाई करा या मागणीसाठी एम आय एम औसाच्या वतीने राष्ट्रपती व गृहमंत्री यांना दिं.4 फेब्रुवारी 2022 शुक्रवार रोजी औसा तहसीलदार मार्फत निवेदन सादर केले आहे या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे खासदार असोदिन ओवेसी हे मागील 20 वर्षांपासून भारतीय संसदमध्ये संसद म्हणून असून त्यांना अनेक वेळा संसद रत्न पुरस्कार प्रदान झालेला आहे. वारंवार बॅरिस्टर ओवेसी यांच्यावर व त्यांचे निवासस्थानावर आतंकवादी हमले करून बॅरिस्टर यांना कट रचून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तरी सदर प्रकरणाची चौकशी साठी एन आय ए या यंत्रणेकडून तपास करण्यात यावा 3 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या हल्ल्यातील  आरोपीची

नार्को टेस्ट करण्यात यावी. बॅरिस्टर असोदिन ओवेसी यांना झेड सुरक्षा प्रदान करण्यात यावी. आणि संविधान रक्षण करणाऱ्या वर जाणून-बुजून हल्ले करून संपविण्याचा या घटनेचा निषेध औसा येथे 4 फेब्रुवारी 2022 शुक्रवार रोजी एम आय एम तर्फे तहसीलदार मार्फत राष्ट्रपती व गृहमंत्री यांना या मागणीचे निवेदन सादर केले. व औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यासाठी औसा एम आय एम  तर्फे अर्ज देण्यात आला यावेळी या निवेदनावर एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, नेते एडवोकेट गफुरूल्ला हाशमी, कायदेशीर सल्लागार एडवोकेट रफिक शेख, सय्यद कलीम,अजहर कुरेशी,हकीम बागवान , फारुख काझी, शेख सिराज,मजहर पटेल,शेख नयुम,मौला शेख,तुराब पठाण,हारुणखॉ पठाण, निसार बापुडे, सय्यद जलील,जाकेर शेख,अफसर शेख,तैय्यब सय्यद, शहाबुद्दीन पठाण आदिची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments