गजेंद्र डोलारे गुरुजी यांचे निधन

 गजेंद्र डोलारे गुरुजी यांचे निधन 


औसा प्रतिनिधी 

भारतीय जनता पार्टीचे औसा तालुका सचिव तथा नेताजी विद्यालय शिंदाळा लो येथील सेवानिवृत्त आदर्श शिक्षक गजेंद्र बळीराम डोलारे यांचे मंगळवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 60 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा व एक विवाहित मुलगी नातू असा परिवार आहे. दिवंगत गजेंद्र डोलारे गुरुजी हे उत्कृष्ट वक्ते व विविध विषयावर लेखन करणारे आदर्श शिक्षक होते. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास चिंचोली ता औसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यविधीसाठी नातेवाईक समाज बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments