गुळखेडा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

 गुळखेडा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ


 


नरेगा मधून 48 लाख 31548रु निधी मंजूर 


रोजगार सेवकांच्या प्रयत्नामुळे गावचा कायापालट 


औसा प्रतिनिधी 


औसा तालुक्यातील मौजे गुळखेडा हे ग्रुप ग्रामपंचायत असणारे गाव आहे. या गावात रोजगार सेवकांनी गावात अनेक प्रकारच्या योजना राबवून गावचा कायापालट केला असून गावच्या विकासात मोठ्या प्रमाणात भर झाली आहे. 18 फेब्रुवारी 2021 रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ  शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. 

ग्रामपंचायत अंतर्गत नरेगा योजना प्रभावी पणे राबवण्यासाठी रोजगार हमी योजनेचा कणा म्हणून रोजगार सेवकांस ओळखले जाते. रोजगार सेवक जर कार्यतत्पर असेल तर गावचा कायापालट होऊन विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही. गुळखेडा येथील रोजगार सेवक विठ्ठल पांचाळ यांच्या प्रयत्नातून नरेगा विभागाच्या अंतर्गत सन 2021-2022 या वर्षात जवळपास गावातील वैयक्तिक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जिवनात क्रांती केली असून शेतकऱ्यांच्या लाभांच्या यशस्वी योजना राबवत 48लाख 31548 रुपये ची विकास कामे राबवली असून त्यामध्ये वैयक्तिक सिचन विहीर, सार्वजनिक सिंचन विहीर, फळबाग लागवड, जनावरांच्या गोठा या माध्यमातून गुळखेड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. त्यामुळे गावच्या विकासासाठी हातभार लागला असुन रोजगार सेवकांच्या प्रयत्नामुळे गावचा कायापालट झाला आहे. रोजगार सेवकांच्या कार्यांचे शेतकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

आज गुळखेडा येथील 11शेतकऱ्यांना जनावरांच्या गोठ्यांचे मार्कावट देण्यात आले  यावेळी गावचे सरपंच पती बबन चेंडके, ग्रामपंचायत सदस्य भास्कर यादव महालिंग गिराम,खुदुस पटेल,शिवाजी आळणे, नानासाहेब भोसले, भास्कर भोसले,सुभाष सिरसले,गोविंद दाणे,महेश गिराम, शिवशंकर गिराम, सुलेमान शेख,जमिल शेख,गोरोबा रोंगे,जिवन चिलबिले,सर्वलिंग चिलबिले, बब्रुवान भोसले पंचायत समिती चे तांत्रिक अधिकारी अबरार तांबोळी, रोजगार सेवक पांचाळ विठ्ठल, राजकुमार कांबळे,निळकंठ तळेकर, यांच्या सह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना रोजगार सेवक पांचाळ विठ्ठल म्हणाले की गुळखेडा ग्रामपंचायत अंतर्गत नरेगा विभागातून गावासाठी निधी हा गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांच्या सहकार्याने मिळाला असून त्यांनी आम्ही मागणी केलेल्या सर्व कामांना तात्काळ मंजुरी दिल्याने हे सर्व शक्य झाले आहे. असे ते म्हणाले. भुजबळ साहेब यांच्या सारख्या कर्तव्य दक्ष व कार्यतत्पर अधिकारी असल्याचे गावासाठी इतक्या मोठा निधी मिळवू शकलो.

Post a Comment

0 Comments