कर्नाटक येथील हिजाब बंदच्या विरोधात एम आय एम पक्षाच्या वतीने औशात निषेध
काँग्रेस व राष्ट्रवादी पार्टीचा एमआयएमच्या आंदोलनाला पाठिंबा
औसा प्रतिनिधी
औशात शहरात एमआयएम पक्षाच्या वतीने औसा तहसील कार्यालय समोर कर्नाटक येथील उडपी मधील पियू कॉलेजमध्ये मुस्लिम विद्यार्थिनीला हिजाब घालून शाळेत प्रवेश बंदी चुकीचा व बेकायदेशीर आदेश दिला आहे. लोकशाही भारतीय राज्य घटनेच्या कलम 19(1),25(1) अनुषंगाने प्रत्येक व्यक्तीस धार्मिक,सामाजिक आचरणाची मुभा राज्यघटनेने स्वतंत्र मूलभूत अधिकार देण्यात आले आहे. त्यांच्या उल्लंघन करून आदेश पारित केले आहे ते त्वरित रद्द करण्यात यावे तरी भारतातील प्रत्येक शाळेमध्ये मुलींना गणवेशामधे
व गणवेशाच्या रंगाचा रंगाचा हिसाब घालून शिक्षण घेण्यासंबंधीचे अध्यादेश काढून त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. मुलीचे शिक्षण संबंधात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यावर हिंसा प्रवृत्त करणारे व्यक्ती वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व देशातील सर्व महिला विद्यार्थ्यांना अंगभरून गणवेश घालण्याचा कायदा करण्यात यावा जेणे करून देशातील महिला सुरक्षित राहतील अशा प्रकारच्या निवेदन औसा तहसील कार्यालय मार्फत राष्ट्रपती भारत सरकार यांना देण्यात आले. या आंदोलनात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष व औसा नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाठिंबा दिला आहे. तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख शकील यांनीही या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे. व मुस्लीम विकास परिषद च्या वतीने सुद्धा या आंदोलनास पाठिंबा देऊन निषेध व्यक्त केला आहे .यावेळी एम आय एम चे अड. गफुरुला हाश्मी, सय्यद मुजफ्फर आली ईनामदार ,अड.आर एम शेख, अफसर शेख, हारुणखा पठाण मुस्लीम विकास परिषदचे मन्सूर रुईकर, काँग्रेसचे कार्यकर्ते खाजा भाई शेख,शेख महेबुब ,अझहर करेशी, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
एमआयएमच्या तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कर्नाटक मध्ये झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. डॉ अफसर शेख लातूर जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
0 Comments