औसा नगरपालिकेत प्रोसिंडीग बुकाच्या मागणीवरुन काॅग्रेस आक्रमक

 औसा नगरपालिकेत प्रोसिंडीग बुकाच्या मागणीवरुन काॅग्रेस आक्रमक 


औसा

 मुख्तार मणियार


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एडवोकेट मुजीबोद्दीन पटेल यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तत्कालीन नगरसेवक हे औसा शहरातील सांस्कृतिक सभागृहास स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अडवोकेट मुजीबोद्दीन पटेल यांचे नाव द्यावे अशी मागणीचे निवेदन देण्यास नगरपालिकेत गेले होते. त्या ठिकाणी मुख्याधिकारी यांना नगरपालिकेच्या मागील पाच वर्षातील कामकाजा संदर्भांत विचारपूस करत सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग बुक आम्हास दाखवा अशी मागणी केली, तसे लेखी पत्र देण्यात आले. मुख्याधिकारी वसुधा फड त्यांना प्रोसिडिंग बुक दाखवू शकले नसल्याने काॅग्रेस आक्रमक झाले. यावर संतप्त  उपस्थितांनी लोकशाही मार्गाचा वापर करत आपल्या मागणीसाठी मुख्याधिकारी यांच्या दालनात तब्बल तीन तास ठिय्या करीत निषेध केला. तसे करून सुद्धा सर्वांसमोर प्रोसिडिंग बुकच आले नाही. संबंधित विभागाच्या कर्मचारी जो सकाळी कार्यालयात हजर होता त्यास अचानकपणे दवाखान्याच्या कामासाठी लातूरला जावे लागल्याने प्रोसिडिंग बुक त्याच्या कपाटात असल्याचे समाधान कारक उत्तर मुख्याधिकारी यांनी दिल्याने उपस्थितांनी आणि पालिकेच्या कारभारावर असंतोष व्यक्त केला. शहरातील जनतेचे विश्वास असणाऱ्या पालिका प्रशासन चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने औसेकरांना  न्याय मिळण्याची आस करणे चुकीचे आहे. त्याची माहिती जर मिळत नसेल तर पालिकेचे प्रशासन किती जागरुक  त्यांचा कारभार किती पारदर्शक आहे याची प्रचिती येते.यात  सर्वांची मिलीभगत असल्याचे याचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत असल्याचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष शकील शेख, अॅडव्होकेट समीयोद्दीन पटेल,नगरसेवक अंगद कांबळे, जयराज कसबे, सदानंद शेटे, हमीद सय्यद,खादर सय्यद,मुज्जमिल शेख, मौलाना कलीमुल्ला,खुंदमीर मुल्ला, गुलाब शेख,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments