श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर औसा येथे मास्क व सॅनिटायझर वाटप

 *श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर,औसा.औसा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट यांच्या तर्फे मास्क व सॅनिटायझर वाटप*

औसा-आज दिनांक २१/०२/२०२२.सोमवार रोजी श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर औसा येथे ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन चे अध्यक्ष श्री जगन्नाथजी शिंदे उर्फ आप्पासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त औसा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन तर्फे मास्क व सॅनिटायझर मोफत वितरण करण्यात आले. 

   याप्रसंगी तालुका अध्यक्ष श्री संजयजी भालकीकर , सेक्रेटरी श्री अब्दुल आसिफ शेख, समन्वयक श्री प्रकाशजी गोमदे, कोषाध्यक्ष श्री संतोष जी कल्याणी यांच्या शुभहस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजयजी भालकीकर म्हणाले लहान मुलांचे व्हॅक्शिनेशन झाले नसल्यामुळे लहान मुलांनी काळजी घेण्याचे आव्हान सर्व विद्यार्थ्यांना केले.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीपकुमार माशाळेसाहेब यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल तालुका कमिटीचे कौतुक करून आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री भिसे बी एस यांनी केले.


Post a Comment

0 Comments