शहरातील शासन योजनेच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण काळावे व शहरातील अनेक समस्या वर नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करित आहे याबाबत एम आय एम चे निवेदन
औसा प्रतिनिधी
औसा-शहरातील शासन योजनेच्या नावाखाली होत असलेले अतिक्रमण काळावे व शहरातील अनेक समस्या वर नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करित आहे याबाबत एम आय एम च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
शहरातील विविध भागातील शासनाच्या योजनांच्या नावाखाली शहरात होणारे अतिक्रमणे काढण्या संदर्भात नगरपालिका प्रशासनाला वेळोवेळी निदर्शने देऊन शहरातील विविध भागातील अतिक्रमणे काढण्यात आली नाही व याबाबत कसलीच कारवाई करण्यात आली नाही. शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच शहरातील विविध प्रभागांतील भागामध्ये घरकुल व शौचालयाच्या नावाखाली वाढते अतिक्रमणे करून खुल्या जागा बडकवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
सिटी सर्वे व भुमी अभिलेख कार्यालयात शहरातील मूळ जागांची नोंद असलेल्या जागा पैकी अतिक्रमणे करून शहरात खुल्या जागा बळकावण्याचा प्रयत्न चालू आहे ते त्वरित थांबविण्यात यावे. व शहरातील विविध समस्या वर नगर पालिका दुर्लक्ष करीत आहे. जनतेच्या मूलभूत सुविधा साठी नगरपालिकेचे अस्तित्व असून त्यावर नगर पालिका प्रशासन व नगर पालिका कर्मचारी सुरळीत काम करीत नाही असे दिसून येत आहे तसेच शहरात रस्त्यावर खड्डे पडले आहे. शहरात नाल्यात कुटुंब भरले आहे. शहरात पाणीपुरवठा मोठा वाल लिकेज असून त्यामुळे नालीतील घाण पाणी त्यात जाऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तरी याबाबत आपण जातीने लक्ष घालून या समस्यावर नगरपालिकेला आदेशित करावे.या मागणीसाठी एम आय एम च्या वतीने जिल्हाधिकारी यांना आज दिनांक 18 फेब्रुवारी 2022 शुक्रवार रोजी निवेदन सादर केले.यावेळी या निवेदनावर एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.
0 Comments