औसा ते श्रीक्षेत्र पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळ्याची श्री नाथ मंदीर औसा येथे गोपाळ काल्याने सांगता.

 औसा: श्रीक्षेत्र औसा ते श्रीक्षेत्र पंढरपुर माघ वारी पायी दिंडी सोहळ्याची आज श्री नाथ मंदिर औसा येथे गोपाळकाल्याने सांगता झाली, त्यानिमित्त समाधी स्थापना व पूजा, भजन, हजेरीचे कीर्तन,चक्रीभजन, काल्याचे अभंग, पारंपरिक खेळ यासह दहीहंडी फोडून माघवारीची सांगता करण्यात आली, त्यानिमित्त सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर, सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प.श्री.श्रीरंग महाराज औसेकर यांच्यासह परंपरेतील गुरुभक्तांनी आपली हजेरीची कीर्तन सेवा केली. त्याप्रसंगी आदरणीय श्री गोरखनाथ महाराज, श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री रवींद्रनाथ महाराज,श्री श्रीनाथ महाराज, श्री अनिरुद्ध महाराज, वेद शास्त्र संपन्न श्री पुरूषोत्तम जोशी गुरुजी यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments