अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान च्या वतीने औसा येथे शिवजयंती साजरी

 अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान च्या वतीने औसा येथे शिवजयंती साजरी


औसा प्रतिनिधी

औसा -अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने अपंगांच्या कल्याणकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम राज्यभर सुरू आहे.प्रदेशाध्यक्ष आहमद भाई हरण मारे, हेमंत कुलकर्णी जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हि संघटना कार्यरत असून संघटनेच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. छत्रपती शिवराय यांच्या जयंतीचे औचित्य साधून औसा येथील अबुल कलाम चौक पटेल कॉम्प्लेक्स कार्यालयात संघटना यांनी शिवजयंती कार्यक्रम आयोजित केले होते. त्या अनुषंगाने आज कार्यालयात शिवजयंती निमित्त सनाभाई दारुवाले व आत्माराम मिरकले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. .यावेळी हा जयंतीचा दिवस आपल्या सर्व महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशाच्या नागरिकांसाठी एक खुप मोठा आनंदाचा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय म्हणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांनी एक मराठी बाणा तयार करून अत्यंत चांगल्या प्रकारे राज्य प्रस्थापित करुन ख-या अर्थाने त्या काळामध्ये जनतेचे रयतेचे राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवराय यांना आपण  या ठिकाणी मानवंदना  करण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आणि शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत.या ठिकाणी अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून हा छोटासा कार्यक्रम परंतु अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. असे पत्रकार रामभाऊ कांबळे यावेळी सांगितले.या कार्यक्रम प्रसंगी गुणवंत पाटील,बाबुभाई  दारुवाले,गुरूलिंग देशमाने, पत्रकार मुख्तार मणियार, तुकाराम सुर्यवंशी,शेख नय्युम, बाबा शेख, मुख्तार पटेल, संजय कसबे यांच्यासह ईतर सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments